आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Confirms Raids On Teesta, Her Husband Javed Akhtar & Their Publishing Company For Accepting Foreign Contribution

मोदी विरोधक तिस्ता सेटलवाड यांच्या कार्यालय, घरावर सीबीआयचे छापे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तस्ता सेटलवाड (फाईल फोटो) - Divya Marathi
तस्ता सेटलवाड (फाईल फोटो)
मुंबई- गुजरातमधील सामाजिक कार्यकर्त्या व गोध्रा हत्याकांडानंतर प्रकाशझोतात आलेल्या तिस्ता सेटलवाड यांच्या मुंबईतील घरावर आणि कार्यालयावर सीबीआयने आज छापे टाकले. तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती चालवत असलेल्या दोन स्वयंसेवी संस्थांत परकीय चलन नियंत्रण कायद्या (फेमा)चे उल्लंघन झाल्याप्रकरणी केंद्र सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याच चौकशीचा भाग म्हणून सीबीआयने सेटलवाड यांच्या मुंबईतील घर व कार्यालयावर छापे टाकल्याचे बोलले जात आहे. तिस्ता सेटलवाड या मोदी विरोधक मानल्या जातात.
सेटलवाड यांच्या मेसर्स सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिशिंग प्रा.लि. या कंपनीला आणि त्यांचे पती व SBCLचे संचालक जावेद आनंद अख्तर, पेशीमम गुलाम मोहम्मद आणि आणखी एका अज्ञात संचालकाविरोधात चौकशी सुरु आहे. सेटलवाड यांच्या या संस्थेला अमेरिकेतील फोर्ड फाउंडेशनकडून एसीआरए नियमांचे उल्लंघन करून 3 कोटी रूपये स्वीकारल्याचा व त्याची माहिती दडविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिकेशन प्रा.लि या संस्थेच्या नावाखाली हे दोघे कम्युनॅलिझम कॉम्बॅट नावाचे एक नियतकालिक चालवत होते. या नियतकालिकाचे हे दोघेही मुद्रक, प्रकाशक व सहसंपादक होते. परकीय चलन नियंत्रण कायद्यानुसार कुठल्याही स्तंभलेखक, व्यंगचित्रकार, प्रकाशक, मुद्रक, प्रतिनिधी, संपादक यांना परदेशी देणग्या स्वीकारता येत नाहीत. मात्र, सेटलवाड यांनी सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिकेशन प्रा.लि च्या अंतर्ग कॉम्बॅट नियतकालिक चालविल्याचा आरोप आहे. याबाबत सीबीआय कागदपत्रे तपासात आहे. त्याचाच भाग म्हणून आजची कारवाई झाल्याचे समोर येत आहे.