आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Gives Clean Chit To Union Home Minister Sushilkumar Shinde In Adarsh Housing Society Scam Before Bombay High Court.

\'आदर्श\'प्रकरणी सुशीलकुमार शिंदेंना सीबीआयकडून क्‍लीनचिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बहुचर्चित 'आदर्श' सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना क्‍लीनचिट दिली आहे. सीबीआयने उच्‍च न्‍यायालयात आज (गुरुवार) याप्रकरणी अहवाल सादर केला. त्‍यात शिंदे यांना क्‍लीनचिट देण्‍यात आली आहे.

आदर्श सोसायटीला मंजूरी देण्‍याच्‍या प्रक्रीयेदरम्‍यान सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंजूरीमुळेच आदर्श सोसायटीशी संबंधित फाइल्‍सला झटपट परवानगी मिळत गेली. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना आदर्श घोटाळा प्रकरणी आरोपी करावे, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाटेगांवकर यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. या याचिकेची दखल घेऊन हायकोर्टाने सीबीआयला बाजू मांडण्यास सांगितले होते. सीबीआयने याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्‍यात शिंदे यांना क्‍लीनचिट दिली आहे.

'आदर्श' सोसायटी घोटाळा 2010 मध्‍ये उघडकीस आला होता. याप्रकरणी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण, माजी मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्‍यासह अनेक बड्या प्रशासकीय अधिका-यांवर आरोप लावण्‍यात आले होते. आदर्श सोसायटीला मंजूरी देण्‍यात आली त्‍यावेळेस शिंदे यांच्‍याकडे मुख्‍यमंत्रीपद होते. तर अशोक चव्‍हाण त्‍यावेळेस महसूल मंत्री होते. पदाचा गैरवापर करुन मंत्री, नेते आणि अधिका-यांनी 'आदर्श'मध्‍ये सदनिका मिळविल्‍याचा आरोप आहे.