आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीटकनाशक विषबाधेची सीबीआय चौकशी करा; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- यवतमाळमधील कीटकनाशक विषबाधेने शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधेमुळे यवतमाळमध्ये २३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. देशभरात या विषबाधेची चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत याची चौकशी केंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटकडे सोपवली होती. इन्स्टिट्यूटच्या अहवालात अप्रमाणित कीटकनाशकांमुळे मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. तसेच अप्रमाणित बियाणे विकणाऱ्या कंपन्यांची चौकशी करण्याची विनंतीही केल्याचे त्यांनी सांगितले. 
 
कीटकनाशकांमुळे मृत्यू होत असल्याचे स्पष्ट होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. ही कीटकनाशके विकणारे विक्रेते आणि तयार करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.
 
आंध्र प्रदेशात समित्या   
या अवैध एचटी कापसाची लागवड आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे. आंध्र प्रदेशात कापसाखालील एकूण क्षेत्रापैकी १५ टक्के क्षेत्रावर एचटी कापसाची लागवड झाल्याचा अंदाज आहे. अांध्र प्रदेश सरकारने पाच ऑक्टोबरला यासंदर्भात तीन सदस्यांची समिती नेमली आहे. एचटी कापसाचा नेमका काय परिणाम झाला, याचा अहवाल देण्यासाठी समितीला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 
 
जानेवारी महिन्यातच प्रकार उघडकीस; सरकारचे दुर्लक्ष
स्वदेशी जागरण मंचाचे महाराष्ट्र संयोजक अमोल पुसदकर यांनी या अवैध बियाण्यांचा प्रकार जानेवारीत सर्वप्रथम उघडकीस आणला. सावनेरजवळ केळवद येथे या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कापसाचे नमुने नागपुरातील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला तपासणीसाठी दिले होते. कापूस संस्थेने त्यांची तपासणी करून ते भारतात मान्यता नसलेले तणनाशक प्रतिरोधक बियाणे असल्याचा निर्वाळा दिला. संस्थेसह स्वदेशी जागरण मंचाने यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडेही तक्रार दिली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. पुसदकर यांच्या मते हा प्रसार कंपन्यांकडूनच झाला. मोन्सँटो या कंपनीकडेच या बियाण्यांचे जीन आहे. बियाण्यांमध्ये ग्लायफोसेट या घातक समजल्या जाणाऱ्या रसायनाचा वापर करण्यात आला आहे. अमेरिकेत गवत काढण्याचा खर्च परवडत नसल्याने कंपन्यांनी हे तणनाशक प्रतिरोधक बियाणे विकसित केले.
 
पुढील स्‍लाईडवर वाचा, बियाण्यांत आढळल्या ‘हर्बिसाइड टॉलरन्ट’ जीन्स...
बातम्या आणखी आहेत...