संजय राऊत यांना सीबीआयकडून समन्स; 23 जूनला लखनऊ कोर्टात हजेरीचे आदेश
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
(फाईल)
मुंबई - सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांना सीबीआयने गुरुवारी समन्स बजावले आहेत. बाबरी विध्वंस प्रकरणाशी संबंधित तपास करताना सीबीआयने राऊत यांना शिवसेना नेते नाही, तर संपादक म्हणून ही नोटीस बजावली. त्यानुसार, राऊत यांना 23 जून रोजी लखनऊ येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.