आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cbi Notice For Dr. Dabholkar Murder Case, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदू संघटनांचा सहभाग तपासा; दाभोलकरप्रकरणी सीबीआयला नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात हिंदू संघटनांचा हात आहे का? याचा तपास घेण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.

डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. मात्र, अजूनही पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत. त्यामुळे प्रकरणात सीबीआयला प्रतिवादी करण्याची मागणी याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी केली होती. त्याला न्यायालयाने परवानगी दिली. दरम्यान, या हत्येमागे हिंदू संघटनांचा सहभाग असल्याबाबत काहीही पुरावे नसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. दाभोलकर यांना कधी धमकीही देण्यात आलेली नव्हती. ही हत्या हिंदू संघटनांद्वारे करण्यात आल्याचा आरोप हा काल्पनिक आरोप असल्याचे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रातही म्हटले होते. तसेच पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव असल्याचा आरोपही पोलिसांनी फेटाळून लावला होता.