मुंबई - शिना बोरा हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभरातील 9 ठिकाणी सोमवारी छापे टाकले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
येथे टाकले छापे
केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणात देशभरात 9 ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये मुंबईमध्ये तीन ठिकाणी, गोवामध्ये दोन, गुवाहाटीमध्ये एक, कोलकत्यामध्ये दोन , तर छिंदवाडमध्ये एका ठिकाणी छापा टाकला आहे.
24 एप्रिल, 2012 मध्ये झाली होती हत्या
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार शीनाची हत्या इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर यांनी मिळून केली आहे. राकेश मारिया यांनी माहिती दिली होती की, 24 एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची हत्या करण्यात आली होती. 23 मे रोजी पोलिसांनी शीनाच्या जळालेल्या मृतदेहाचे अवशेष तपासणीसाठी घेतले. तेव्हापासून या प्रकरणाने विविध वळणं घेतली आहेत. आता सीबीआयने देशात 9 ठिकाणी छापे मारल्याने काही नवीन माहिती यातून हाती येण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइड्मध्ये वाचा, का सोपवले होते सीबीआयकडे प्रकरण ..