आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेच्या जेवणावर CCTV ठेवणार नजर, तर SMS सांगणार मेनू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खाण्यापिण्याच्या वस्तूंबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या पेन्ट्रीकारमध्ये (रसोईयान) सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. सुरूवातीला काही रेल्वेंमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येईल. या कॅमेर्‍यांची कामगिरी चांगली ठरल्यानंतर इतरही सर्व रेल्वेमध्ये हे कॅमेरे लावण्यात येतील. रेल्वे मंत्रालयाचे महानिर्देशक अनिक सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या एका महिन्यात काही रेल्वेंमध्ये ही व्यवस्था सुरू करण्यात येईल.
रेल्वे मंत्रालयाला नुकतेच खाण्यासंदर्भातील प्रवाशांच्या सर्व तक्रारी योग्य असल्याचे समजल्यावर संबंधित केटरर्सवर एक लाख रुपयांचे दंड ठोकले. तसेच खाण्यापिण्याचा दर्जा वाढवण्यासाठी आणि खाण्याच्या पदार्थांच्या किंमतींवर एसएमएम आणि तक्रार करण्यासाठी एक १० अंकांचा नंबर दिला आहे. तसेच केटरींगशी संबंधीत माहिती देणारे स्टीकरही रेल्वेमध्ये चिटकवण्यात येणार आहेत.