आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेपासून घरापर्यंत करत होते पाठलाग, संधी मिळाल्यावर केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅंकेपासून घरापर्यंत हे युवक व्यापाऱ्याचा पाठलग करत होते. व्यापारी आपली स्कुटर कधी पार्क करतो याची ते वाटत होते. - Divya Marathi
बॅंकेपासून घरापर्यंत हे युवक व्यापाऱ्याचा पाठलग करत होते. व्यापारी आपली स्कुटर कधी पार्क करतो याची ते वाटत होते.
मुंबई- भिवंडी येथील बॅंकेतून पैसे काढून घरी जात असलेल्या एका व्यापाऱ्याला दुचाकीवर आलेल्या व्यक्तींनी लुटल्याची घटना घडली आहे. अवघ्या काही क्षणात त्यांनी व्यापाऱ्याकडे बॅगेत असणारी 2 लाख 30 हजार रुपयांची रक्कम लुटून नेली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा तपास सुरु केला आहे.
 
व्यापाऱ्याला होऊ दिली नाही जाणीव
- शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश जाधव यांनी सांगितले की, गैबी नगरमध्ये राहणारे अब्दुला अन्सारी हे आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणण्यासाठी बँकेत गेले होते. 
- धामणकर चेक पोस्ट भागात असणाऱ्या बँकेतून त्यांनी 2 लाख 30 हजार रुपये काढले आणि स्कूटरवरुन आपल्या घरी गेले.
- अन्सारी बँकेतून बाहेर निघाल्यावर त्यांच्या मागे दुचाकीवर दोन युवक आले. पण त्यांनी याची अन्सारी यांना जाणीव होऊ दिली नाही. 
- ते युवक अन्सारी यांच्या मागोमाग त्यांच्या घरापर्यंत आले. अन्सारी यांनी स्कूटर लावली आणि ते बॅग घेऊन चालू लागले. त्याचवेळी हे युवक दुचाकीवरुन त्यांच्या जवळ आले आणि एका झटक्यात बॅग घेऊन फरार झाले.
- अन्सारी यांनी आणि स्थानिक युवकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले. 
- ही सगळी घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या युवकांना पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...