आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल अ‍ॅपच्याबरोबर साजरा करा रंगोत्सव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अंगावर रंग आणि पाणी पडलेले आवडत नसल्याने रंगपंचमी म्हटली की काही जण लगेच नाक मुरडतात; पण आजच्या डिजिटल जमान्यात प्रत्यक्ष रंग उडलेच पाहिजे असे कोठे आहे. ‘व्हर्च्युअल’ रंगपंचमी साजरी करण्यासाठी असंख्य पर्याय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ? . नुसते गुगल प्लेवर जा आणि होली टाइप करा अनेक अ‍ॅप तुम्हाला दिसतील. काही अ‍ॅप तर चकटफू असल्याने होळीची डिजिटल मस्ती तुम्हाला आरामात करता येऊ शकेल. इतकेच नाही तर तुम्हाला आवडलेला एखादा फंडू वॉलपेपर तुम्ही शेअरही करू शकता. तेव्हा झटपट गुगल प्लेवर जाऊन हे अ‍ॅप डाऊनलोड करा आणि तुमच्या स्मार्टफोन, आयपॅड किंवा टॅबवर डिजिटल रंगपंचमीची मजा लुटा.


होळी एसएमएस
कितीही रंगांची उधळण केली, पाण्याची उडवाउडवी केली तरी होळी - रंगपंचमीचे संदेश दिल्याशिवाय ती पूर्ण कशी होणार? आपल्या खास मित्र- मैत्रिणींना किंवा जवळच्यांची ‘चंमतग’ करण्यासाठी या अ‍ॅपमध्ये अनेक इंग्रजी आणि हिंदी एसएमएस आहेत. विशेष म्हणजे हे एसएमएसदेखील रंगीत आहेत. इतकेच नाही तर होळी सणाशी निगडित गोष्टीदेखील यात आहेत.


कानसेनांसाठी खास होळी साँग्ज
या भन्नाट अ‍ॅपसाठी इंटरनेटची गरज नसल्याने तुम्ही ऑफलाइन राहूनही होळीच्या गाणी बेधुंद होऊन ऐकू शकता. होली के दिन, सात रंग मे, आज ना छोडेंगे, जय जय शिव शंकर, रंग बरसे भिगे चुनरवाली, मोहे छेडो ना यांसारखी अनेक मेलडियस गाण्यांचा संग्रह या अ‍ॅपवर आहे. फक्त मूड बनवायचा आणि गाणी ऐकायची बस.


होळी मॅजिक टच
या अ‍ॅपमध्ये नानाविध रंगांनी होळी खेळता येऊ शकेल तसेच होळीशी संबंधित किंवा वेगवेगळे रंग घेऊन वॉलपेपर्स तयार करता येऊ शकतील.


ट्यून टू होळी : नोकियाने आपल्या विंडोज मार्केटप्लेसवर आणलेल्या या अ‍ॅपमध्ये खास बॉलीवूड आणि पारंपरिक लोकगीतांचा नजराणा आहे. सर्वच पिढ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेली काही खास गाणी तुमच्या होळीच्या मस्तीत आणखी भर घालतील एवढे नक्की.


होळी : नोकियाच्या या आणखी एका अ‍ॅपवर होळी सणाचे महत्त्व, साजरा करण्याच्या पद्धती हे जाणून घेता येऊ शकेल.


हॅपी होळी लाइव्ह पेपर
प्रत्यक्ष रंग आणि पाणी उडवायला नाही मिळाले म्हणून काय झाले, पण या अ‍ॅपवरील लाइव्ह पेपरवर तुम्हाला मनसोक्त रंगांची उधळण करतानाच पाण्याचे फुगे मारण्याची मजा देखील लुटता येणार आहे. कारण हे पाण्याचे रंगीत फुगे थेट तुमच्या स्क्रीनवर येऊन फुटतील इतकेच नाही, तर तुम्हालाही ते फोडता येऊ शकतील, पण घाबरू नका, या पाण्याने तुमचा मोबाइल खराब होणार नाही इतके निश्चित. याशिवाय यामध्ये ओशन ब्ल्यू आणि हॅझी सनशाइनसारख्या आठ कल्पक अशा रंगीत थीम्सदेखील आहेत. यातून तुमच्या पसंतीची कोणतीही थीम तुम्हाला वॉलपेपरवर घेता येऊ शकेल. मूड कायम ठेवण्यासाठी अ‍ॅनिमेटेड थीम्सदेखील आहेत.