आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छटपूजा उत्सवात सेलिब्रिटी नाहीच; हायकोर्टाने सुनावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जुहू बीचवर १७ व १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या छटपूजेदरम्यान सेलिब्रिटींना आमंत्रित करू नये, याबाबत मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर हस्तक्षेप करण्यास साेमवारी उच्च न्यायालयाने नकार देऊन आपला पूर्वीचा निकाल कायम ठेवला. न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली.

छटपूजेदरम्यान सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यासाठी बिहारी फ्रंट संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. मात्र, संभाव्य गर्दी लक्षात घेता येथे दुर्घटना होऊ शकते, असे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी यास परवानगी नाकारली. त्यामुळे संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पूर्वीचा निकाल कायम ठेवत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

छटपूजेसाठी भाविकांना सर्व सहकार्य : भाजप
बिहार, उत्तर प्रदेशातील लाेकांना राेजी मुंबईत छटपूजा साजरी करण्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वताेपरी सहकार्य केले जाईल, अशी माहिती भाजपचे महासचिव अमरजित मिश्रा यांनी दिली. न्यायालयाच्या निर्णयाच्या अाधीन राहून प्रशासन सहकार्य करेल, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बिहार निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपला उत्तर भारतीयांचा कळवळा अाला अशा प्रतिक्रिया उमटत अाहेत.

पावित्र्य राखा : माेहन मिश्रा
‘छटपूजा हा पावित्र्याचा सण अाहे. मात्र, दुर्दैवाने यात राजकारण शिरले अाहे. जर काही ‘उत्साही’ नेत्यांनी या छट पूजेत कलाकार, काॅमेडियन यांना बाेलावणे थांबवले तर त्याचे पावित्र्य कायम राहील,’ अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय सेलचे उपाध्यक्ष माेहन मिश्रा यांनी व्यक्त केली.