आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs Celebrate Dahi Handi Event In Mumbai And Pune

PHOTOS: पुणे-मुंबईत \'गोविंदा आला रे\' ची धूम, अनेक सेलेब्सनी लावली हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आमदार राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडी उत्सवात सामील झालेली बिपाशा बसू)
मुंबई/ पुणे- संपूर्ण राज्यात सोमवारी जन्माष्टमी अर्थात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबई, पुण्यापासून राज्यातील सर्व शहरात दिवसभर दहीहंडी स्पर्धा झाल्या. यात सामान्य लोकांपासून ते बॉलिवूडमधील बड्या हस्तींनी हजेरी लावली. दादरमधील माधववाडीत मुंबईतील पहिली दहीहंडी फोडण्यात आली. तर घाटकोपर येथील सचिन आहीर यांच्या दहीहंडी उत्सावात अनेक बॉलिवूड मंडळींनी उपस्थिती लावली. यंदा मुंबई-ठाणे पट्ट्यात सुमारे छोट्या-मोठ्या स्वरूपाच्या चार हजारांपेक्षा दहीहंडी मंडळाने हा उत्सव आयोजित केला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा व उपस्थित लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूडसह इतर क्षेत्रातील सेलेब्स यांनी हजेरी लावली.
अनेक कलाकार सामील- दहीहंडी उत्सवात अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बिपाशा बसू, माधुरी दीक्षित, जॅकलीन फर्नांडिस, दिया मिर्झा, अक्षयकुमार, अनिल कपूर, ऋतिक रोशन, परिणिती चोप्रा, प्राची देसाई, डेझी शाह, मुग्धा गोडसे, कायनात अरोरा, दिव्यांका त्रिपाठी यांनी हजेरी लावली. मराठी बाला नेहा पेंडसे, प्राजक्ता माळी, उर्मिला कानिटकर, कासवी कांचन, संजना गणेशन, राजेश्वरी खरात, तेजश्री प्रधान, प्रतीक्षा जाधव यांनी पुणे-मुंबईत दहीहंडी उत्सवाच्यावेळी लोकांत मिसळून जोरदार मस्ती केली.
400 गोविंदा जखमी- पुणे, मुंबई, ठाण्यात सर्वात उंच व धोकादायक स्थितीतील हंड्या फोडल्या गेल्या. यावेळी 400 पेक्षा जास्त गोविंदा जखमी झाले आहेत. यात एकाचा चक्कर येऊन मृत्यू झाला तर, 29 जण गंभीर आहेत. उर्वरित जखमी गोविंदांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.
नियमांची पायमल्ली- सोमवारी झालेल्या दहीहंडी उत्सवाच्यावेळी सर्वच दहीहंडी मंडळांनी व आयोजकांनी सुप्रीम कोर्टाने आखून दिलेले आदेश धाब्यावर बसविले. सर्वत्र डीजेच्या तालावर 65 डेसीबलपेक्षा आवाज सोडण्यात आला होता. बहुतेक गोविंदा पथकात 12 वर्षाखालील मुले दिसून आली. सुरक्षेसाठी काहींनी हेल्मेट घातले असले तरी खाद्या वगैरे अंथरल्या नव्हत्या. एकूनच दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली पुन्हा एकदा बिभत्स दर्शन घडले. कायदा व सुरक्षेच्या बाबतीत पोलिसांनी चोख काम बजावले. एकट्या मुंबईत 30 हजार पोलिस तैनात होते. ठाणे व पुणे परिसरात शांततेत दहीहंडी पार पडली.
पुढे पाहा, कोणत्या कोणत्या सेलेब्सनी लावली हजेरी...