आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celina Jetely News In Marathi, United Nations Welcome Song

सेलिनाने गायले युनायटेड नेशन्ससाठी वेलकम साँग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अल्पसंख्याकांसाठी, उपेक्षितांसाठी ठोसपणे गेली अनेक वर्षे विविध योजना आणि उपक्रम राबवणारा भारत हा एकमेव देश आहे. तरीदेखील लोकशाही असलेल्या या देशामध्ये समलिंगी संबंधांना मात्र नाकारले जातात हे दुर्दैव आहे, असे मनोगत अभिनेत्री आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार उपक्रमांची अँम्बेसेडर सेलिना जेटली हिने व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रसंघासाठी सेलिनाने नुकतेच प्रथमच ‘द वेलकम’ हे गाणे गायले आहे. गाण्याच्या प्रमोशनसाठी सेलिना मुंबई येथील दैनिक ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात आली होती.

गेल्या दहा वर्षांपासून संयुक्त राष्ट्रसंघामार्फत मानवाधिकार व त्याअंतर्गत समलिंगी संबंधांसंदर्भात काम करत असतानाचे अनुभव या वेळी सेलिनाने ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना सांगितले. तसेच सध्या ती नो एंट्री चित्रपटाच्या दुसर्‍या भागाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तब्बल दहा अभिनेत्री असणारा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, असा विश्वास सेलिनाने व्यक्त केला.
व्यक्त केला. वर्षाला एकच चित्रपट करण्याची तसेच बंगाली चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. विराज आणि विन्स्टन या जुळ्या मुलांच्या संगोपनात व्यस्त असल्याचे ती म्हणाली. पती ऑस्ट्रियन असला तरी त्याला भारतीय खाद्यपदार्थ व भारतीय चित्रपट आवडतात. तो माझा प्रत्येक चित्रपट आवर्जून पाहतो, असेही ती म्हणाली.