आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Dead And Several Injured After Fire In Kinara Hotel In Kurla, Mumbai

मुंबई- कुर्ल्यात हॉटेल सिटी किनारामध्ये सिलेंडर स्फोट, आठ जणांचा दुर्देवी मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील कुर्ला येथील हॉटेल सिटी किनारामध्ये आज दुपारी 1 वाजता झालेल्या सिलेंडर स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
कुर्ला येतील कमानी परिसरात हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये चायनीज फास्ट फूड मिळते. हे हॉटेल सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत चालते. त्यामुळे दुपारी गर्दी कमी होती. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळल्याचे सांगितले जात आहे. यात हॉटेल कर्मचा-यांसह काही ग्राहकांचा समावेश आहे. जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
मृतांची अद्याप ओळख पटली नाही. मात्र, त्यांना घाटकोपरमधील राजावाडी रूग्णालयात पोस्ट मार्टमसाठी नेण्यात आले आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. अग्निशमन दलाच्या दोन बंबानी ही आग आटोक्यात आणली. वायरिंगमध्ये शॉट सर्किट झाल्याने आग लागल्यानंतर हा स्फोट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...