आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद, नाशिक विभागात बांधणार सिमेंट बंधारे : राऊत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- औरंगाबाद, नाशिक विभागातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन राज्य सरकारने या विभागात सिमेंट बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांनी दिली. दुसर्‍या टप्प्यातील बंधार्‍यांच्या कामावर एकूण 234 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

दुष्काळग्रस्त सहा जिल्ह्यांमधील 15 तालुक्यात 1500 सिमेंट बंधारे बांधण्याची योजना सरकारने आखली होती. त्यापैकी 1423 नाले पूर्ण झाले आहेत. या बंधार्‍यांचा लोकार्पण सोहळा नऊ जून रोजी होणार आहे. राऊत म्हणाले, सिमेंट बंधार्‍यांची उपयुक्तता लक्षात घेऊन दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

औरंगाबाद, नगर, बीड, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सातारा व सोलापूर जिल्हय़ात बंधारे बांधण्यासाठी ऑर्डर काढण्यात आली आहे. हे बंधारे ऑगस्टपर्यंत तयार होतील. यात 9360 दलघमी पाणी साठवले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यातील योजनेत जालना, औरंगाबादचा समावेश का केला नाही, या प्रश्नावर राऊत म्हणाले, भूजलपातळी 2 मीटरपेक्षा खाली गेलेल्या तालुक्यांत ही योजना राबवली. त्या वेळी जालना, औरंगाबादची पाणीपातळी दोन मीटरपेक्षा जास्त होती.

एका बंधार्‍यामुळे चार हेक्टर जमीन ओलिताखाली येते व 10 हजार घनमीटर पाणी साठा होतो. तसेच परिसरातील विहिरींमध्येही पाणी जात असल्याने ग्रामस्थ व जनावरांना पाणी उपलब्ध होते. बंधार्‍यांची ही उपयुक्तता पाहून 80 आमदारांनी त्यांच्या विभागात बंधारे बांधण्यासाठी पत्र दिल्याचे राऊत म्हणाले.