आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सॉर बोर्डाचा ‘डर्टी पिक्चर’! ‘ए’ ग्रेडमधील चित्रपट ‘यूए’ श्रेणीत बदलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘फक्त प्रौढांसाठी’च्या (ए ग्रेड) चित्रपटांचे ‘यूए’ व ‘यू’ श्रेणीत नियमबाह्य रूपांतरण केल्याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाला कॅगने चांगलेच फटकारले. दस्तऐवजांत फेरफार व चित्रपट प्रमाणपत्र देण्यात मर्जीतल्या लोकांवर कृपादृष्टी दाखवल्याचा आरोपही कॅगने केला आहे. सेन्सॉर बोर्डाने २०१२-१५ या कालावधीत "ए' श्रेणीतील १७२ चित्रपटांचे ‘यूए’, तर १६६ चित्रपटांचे ‘यूए’तून ‘यू’ श्रेणीत परिवर्तन केले. विहार दुर्वे यांनी अारटीआयद्वारे सेन्सॉरच्या कामकाजाची माहिती मागितली होती.

अनेक कामे अपूर्ण
डिजिटायझेशनसाठी मोठी रक्कम मिळूनही अनेक कागदपत्रांची कामे अपूर्ण आहेत. ६ वर्षांपासून चित्रपट प्रमाणन, तर १२ वर्षांपासून अधिभारात कोणताही बदल केला नसल्याचा ठपकाही कॅगने ठेवला आहे.