आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील मागास विद्यार्थ्यांना मिळणार केंद्राची शिष्यवृत्ती, लाखो विद्यार्थ्यांना लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यासाठी राज्य सरकारने ६०५ अभ्यासक्रमासाठी केंद्रीय शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात अाला. 

दहावीच्या पुढचे शिक्षण घेणाऱ्या ओबीसी निवासी आणि अनिवासी विद्यार्थ्यासाठी केंद्रीय शिष्यवृत्ती योजना राबवते, या योजनेचा लाभ राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना मिळण्याचा मार्ग राज्य सरकारच्या या निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्यातल्या  लाखो विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल.  या ६०५ अभ्यासक्रमामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, अॅग्रीकल्चर, आयुर्वेद, सर्जरी, हाॅर्टिकल्चर, कॉम्प्युटर ,जेनेटिक सायन्स या सारख्या विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांच्या पदवी आणि द्विपदवी कोर्ससाठी ही शिष्यवृत्ती मिळेल, सर्व अभ्यासक्रमांची यादी वेबसाइटवर पाहता येईल.
बातम्या आणखी आहेत...