आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Gov. Say No Ban On The Hindu Janajagran Samitis Web Site

हिंदू जनजागृती वेबसाइटवर बंदी नाहीच : केंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘हिंदूजनजागृती समितीच्या वेबसाइटवर बंदी घालण्याबाबत काेणतीही सूचना देण्यात अालेली नाही,’ असे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या वतीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात अाले.
एअरटेल या कंपनीने अापल्या इंटरनेटवर समितीच्या वेबसाइटवर बंदी घातली अाहे, असा अाराेप करत ती उठवण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकार, ट्राय, दूरसंचार विभागाकडून उत्तर मागवले हाेते. गुरुवारी न्यायमूर्ती अभय अाेक यांच्यासमाेर झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारच्या वतीने वरील उत्तर देण्यात अाले. ‘एअरटेलने वेबसाइटवर विनाकारण घातलेली बंदीमुळे संघटनेची बदनामी हाेत असून विचार स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रकार अाहे,’ असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला.

‘हिंदू राष्ट्राचा प्रचार प्रसार करत असलेल्या हिंदू जनजागृती समितीच्या वेबसाईटवर याच विषयाचे तसेच धर्मशास्त्रविषयक लेख प्रकाशित केले जातात. त्यामुळे या वेबसाईटवर बंदी घालण्याच्या सूचना द्याव्यात अन्यथा त्यांच्याविराेधात दावा ठाेकला जाईल,’ असे इचलकरंजीकर यांनी सांगितले. दरम्यान, इतर सरकारी यंत्रणांनी याबाबत अापले उत्तर सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले अाहेत.