आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयास 35 कोटी, पहिला हप्ता केंद्राकडून मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला असून या रुग्णालयासाठी केंद्र सरकारने ३५ कोटी रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता मंजूर केला आहे.
 
राज्यातील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता या  कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. केंद्र सरकारच्या कुटुंब व आरोग्य कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह,पक्षाघात व संक्रमित आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारच्या भागीदारीने देशातील प्रत्येक राज्यात कर्करोग संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
 
त्यानुसार राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य कर्करोग संस्था स्थापून टाटा रुग्णालयाचे प्रशासकीय संचालक डॉ. कैलास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेत दोन कर्करोग विशेषज्ञ नेमले. यामुळे या केंद्रात कर्करुग्णांवर उपचार सुरू झाले असून यासाठी अणुऊर्जा विभागाने रेडिओथेरपीसाठी भाभाट्रॉन-II हे अत्याधुनिक विशेष संयंत्र उपलब्ध करून दिल्यामुळे त्यास वेग आला आहे. या संयंत्रासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
बातम्या आणखी आहेत...