आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Govt, Passed Maharashtra Housing Regulatory Bill 2012

बिल्डरांच्या लुटीला आता चाप, गृहनिर्माण विधेयकाला केंद्राचा ग्रीन सिग्नल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र सरकारने बनविलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण (नियंत्रण व विकास) विधेयक 2012 ला अखेर केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या प्रस्तावित कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर नियंत्रित विकास व घरबांधणी, सदनिकांच्या विक्री आणि हस्तांतरणाच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्याबरोबरच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हितांचे संरक्षण होणार आहे. राज्य सरकारच्या विधेयकाला राष्‍ट्रपतींची त्वरित मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहनिर्माणमंत्री डॉ. व्यास यांना वेळोवेळी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
कॅम्पाकोला प्रकरणानंतर गृहबांधणी क्षेत्रात नियामक यंत्रणेची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमत करून केंद्राकडे पाठवलेल्या गृहनिर्माण नियामक विधेयकाला राष्‍ट्रपतींची तातडीने मंजुरी घ्यावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहनिर्माणमंत्री डॉ. गिरिजा व्यास यांना पाठवले होते. त्याआधीही मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यास यांना दोन पत्रे लिहली होती.
पुढे वाचा, गिरीजा व्यास का स्वाक्षरी करीत नव्हत्या या विधेयकावर...