आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्ल्यू व्हेल गेम: मुलगा चोरून इंटरनेटचा वापर करत असेल तर त्याला तुमच्या मदतीची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- तुमचा मुलगा अबोल राहत असेल किंवा लपूनछपून इंटरनेटचा वापर करत असेल तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे. तो ब्ल्यू व्हेल गेमच्या जाळ्यात अडकत चालल्याची चिन्हे आहेत. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेण्याबरोबरच आई-वडिलांवर त्याची समजूत काढण्याची जबाबदारी आहे. देशभरात ब्ल्यू व्हेल गेम खेळणाऱ्या तरुणांच्या आत्महत्येनंतर अशीच काहीशी लक्षणे दिसून येत आहेत.  

केंद्रीय गृहमंत्रालयात  ३० ऑगस्ट रोजी एक बैठक झाली. अंतर्गत सुरक्षा सचिव रीना मित्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि केरळच्या पोलिस अधिकाऱ्यांबरोबरच टेलिकॉम कंपन्या आणि गृहमंत्रालयातील निवडक अधिकारी सहभागी झाले होते. या वेळी ब्ल्यू व्हेल गेममुळे आजवर झालेल्या आत्महत्या किंवा तसा प्रयत्न या घटनांचाही आढावा घेण्यात आला. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे  वरिष्ठ संचालक अरविंदकुमार यांनी साेशल साइट्सच्या लिंक्सवर बंदी घालण्याचे आदेश फेसबुक, याहू, व्हॉट्सअॅपच्या संचालकांना दिले आहेत. 

‘ब्ल्यू व्हेल’मुळे यूपीमध्ये दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
उत्तर प्रदेशात ब्ल्यू व्हेलच्या जाळ्यात अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली. हमीरपूरच्या दीपक वर्मा (२१) याने गुरुवारी रात्री घराच्या दुसऱ्या मजल्यावरून गळ्याला दोर लावून उडी टाकली, तर लखनऊच्या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या आदित्य वर्धननेसुद्धा गुरुवारी रात्री रूममध्ये फाशी घेतली. पोलिसांनी या आत्महत्या ब्ल्यू व्हेल गेममुळेच झाल्याचा संशय व्यक्त केला. गेमवर बंदी घालण्यासाठी फेसबुकने अायटी एक्स्पर्ट आणि युजर्सकडे मदत मागितली आहे.

या गेमचा बळी ठरलेल्या मुलांची लक्षणे  
- अशा मुलांच्या शरीरावर जखमेचे व्रण दिसतात. ही जखम कोणत्याही दुर्घटनेत झालेली नसते.  
- घरात ही मुले अबोल झालेली दिसतात. परंतु इंटरनेटचा वापर लपून -छपून करतात.  
- इंटरनेटचा वापर करणे जमले नाही तर ती चिडचिड करतात.  
- अशा मुलांच्या  सोशल मीडिया किंवा एखाद्या पोस्टवर ब्ल्यू व्हेलचे छायाचित्र दिसते.  
- ही मुले इंटरनेटचा वापर खास करून रात्रीच करतात.  

मुलांना चांगल्या प्रकारे समजावून सांगा  
- गेम अॅडमिन त्याचे किंवा कुटुंबीयांचे काही नुकसान करत नसतो.  
-  हा गेम ब्रेेन वॉश करून खेळण्यास भाग पाडले जाते. यामुळे अशा मुलांना पुन्हा
- आपले सामान्य जीवन सुरू करता येते.  
- गेम अॅडमिनचे आदेश मानण्याची काही गरज नाही. तू त्याला बांधील नाहीस.  
- तुम्ही कधीही हा गेम सोडू शकता. अॅडमिनचा कॉल येत नसतो.
बातम्या आणखी आहेत...