मुंबई - आर्थिक राजधानी मुंबईपाठोपाठ राज्यातही गंभीर वीजसमस्या निर्माण होण्याची चिन्हे िदसताच राज्य सरकार खडबडून जागे झाले. मुंबईतील बत्ती गुल प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी ऊर्जा िवभागाच्या मुख्य सचिवांकडून करण्याचेही सरकारने ठरवले आहे. तसेच या संकटाची जबाबदारी केंद्रावर ढकलून हात झटकण्याची खेळी राज्य सरकारने खेळली आहे. राज्यात सुरू असलेला गणेशोत्सव आणि दसरा - दिवाळीचे सण लक्षात घेऊन या प्रश्नी केंद्राने त्वरित तोडगा काढावा, वीज संकटग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे पंतप्रधान
नरेंद्र मोदींना केली आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, वीजनिर्मितीमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग असावा यासाठी खासगी कंपन्यांकडून स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या होत्या, तथापि, या निविदा अंतिम होईपर्यंत इंधन उपलब्धतेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. यापूर्वी झालेल्या वीज खरेदीला कायदा बदलाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या वादामुळे खासगी वीज उत्पादकांनी वीजनिर्मिती सुरू ठेवण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भारनियमन करावे लागत आहे. सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू असल्यामुळे या समस्येची तीव्रता आणखी वाढली असल्याचे पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
सरकारने थकवले महिन्यांचे बिल : राज्यातील खासगी वीजनिर्मिती कंपन्यांना परदेशातून आणि राज्यातून कोळसा पुरवठा केला जातो. इंडोनिशियातून या कंपन्यांना कोळसा आयात केला जातो. मात्र, या देशाने त्यांचे धोरण बदलल्याने तेथून येणारा कोळसाही बंद झाला आहे. त्यामुळे या वीजनिर्मिती कंपन्यांना कोट्यवधींचा तोटा होत असून या कंपन्यांनी राज्याला वीज देण्यास नकार दिला आहे. अशातच या कंपन्याची महिन्याचे वीज बिल राज्य सरकारने थकवले आहे. सध्या हजार मेगावॅटचा तुटवडा भासत आहे. संकटातून मार्ग निघेपर्यंत बाहेरून वीज घ्यावी लागणार असून त्यासाठी दरमहा ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे.असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये, पीयूष गोयल यांचे मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर आरोप