आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शानदार कोचमध्ये बसवले आहेत LCD TV; 180 डिग्रीत फिरतात सर्व सीट्‍स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईकरांना लवकरच शानदार विस्टाडोम कोचमध्ये बसून यूरोपातील सफरीचा आनंद घेता येईल. चेन्नई कोच फॅक्टरीत निर्मिती करण्यात आलेल्या विस्टाडोम कोच मुंबईत ( मध्य रेल्वे) दाखल झाले आहेत. खास पर्यटकांसाठी या कोचची निर्मिती करण्‍यात आली आहे.

मुंबईत पोहोचले कोच...180 डिग्रीत फिरतात चेअर्स..
- एसी कोचमध्ये एकूण 40 सीट्‍स असून त्या 180 डिग्रीत फिरतात. प्रवाशांना एरियल व्ह्यूचाही   आनंद मिळावा म्हणून ही व्यवस्था करण्‍यात आली आहे.
- निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोचच्या खिडक्या मोठ्या असून छत देखील पारदर्शक बनवण्यात आले आहे.
- एका कोचमध्ये एकूण 12 एलसीडी बसवले आहेत.
- एक फ्रिज आणि ओव्हन, ज्यूसर ग्राइंडर, हॉट केसची व्यवस्था आहे. स्वयंचलीत दरवाजे बसवण्यात आले आहे.
- प्रवाशांचा सामान ठेवण्यासाठी कोटमध्ये स्वतंत्र व्यवस्था आहे.
- एक कोचवर 3.38 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. एका कोचमध्ये 40 लोक आरामात बसू शकतात.
- चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीत (ICF) या कोचची निर्मिती करण्‍यात आली आहे.

कर्जत-लोणावळा दरम्यान धावणार्‍या एक्स्प्रेसला बसवणार विस्टाडोम कोच...
- डोंगराळ भागातून जाणार्‍या एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांना नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेता यावा, या पार्श्वभूमीवर या कोचची निर्मिती करण्यात आली आहे.
- सध्या विस्टाडोम कोच विशाखापट्टनम् ते अराकू व्हॅली हिल स्टेशनदरम्यान धावणार्‍या एक्स्प्रेसला हे कोच बसवण्यात आले आहेत. आता हे कोच मध्य रेल्वेला प्राप्त झाले आहेत.
- मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ता सुनील उदासी यांनी सांगितले की, विस्टाडोम कोच मुंबई विभागातील कर्जत-लोणावळा आणि कसारा-इगतपुरीदरम्यान धावणार्‍या एक्सप्रेस गाड्यांना बसवण्यात येणार आहे.

जनरलपेक्षा जास्त भाडे...
- विस्टाडोम कोच सर्व एक्स्प्रेड गाड्यांना बसवण्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
- जनरल कोचच्या तुलनेत विस्टाडोम कोचचे भाडे जास्त असण्याची शक्यता आहे.
- पर्यटकांची संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा रेल्वेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...शानदार विस्टाडोम कोचचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...