आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू; गाड्यांना अर्धा ते पाऊण तास उशीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वांगणी-शेलू स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक दुरुस्तीच्या कामानंतरही अद्याप रुळावर आलीच नाही. मध्य रेल्वेवरील लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे भाऊबीजेसाठी घराबाहेर पडलेल्या उपनगरांतील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
कर्जत-पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची लोकलसेवा आज भाऊबीजेच्या दिवशीही विस्कळीत झाली. सकाळीच वांगणी-शेलू या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे कर्जत-पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या जलद आणि धीम्या मार्गावरील लोकलसेवा अद्यापही सुमारे अर्धा तासाने उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेवरील स्थानकांवर प्रवाशांना लोकलची वाट पाहत बसावे लागत आहे. लोकल उशिराने धावत असल्याची उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असली तरी त्याचं कारण सांगितले जात नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. 
बातम्या आणखी आहेत...