आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नऊ काेटींची लूट करणाऱ्या दराेडेखाेरांची टाेळी ‘चेकमेट’, सहा अाराेपी जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाण्याच्या चेकमेट कंपनीवर दराेडा टाकणाऱ्या सहा जणांच्या टाेळीला गुरुवारी पाेलिसांनी अटक केली. - Divya Marathi
ठाण्याच्या चेकमेट कंपनीवर दराेडा टाकणाऱ्या सहा जणांच्या टाेळीला गुरुवारी पाेलिसांनी अटक केली.
नाशिक- ठाण्यातील चेकमेट सर्व्हिस प्रा.लि. या आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण करणाऱ्या कंपनीवर दरोडा टाकून तब्बल नऊ काेटींची लूट करणाऱ्या नाशिकमधील दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यास ठाणे गुन्हे शाखेला यश आले आहे. सहा संशयितांना शहर आणि ग्रामीण भागातून गुरुवारी अटक करण्यात आली. अाराेपींकडून सुमारे कोटींची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या दरोड्यात आणखी १२ संशयितांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरदीप बिल्डिंगमध्ये आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण करणाऱ्या चेकमेट कंपनीवर मंगळवारी सशस्त्र दरोडा टाकून कोटींची रक्कम लुटून नेली होती. या गुन्ह्याचा ठाणे गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. सहायक पोलिस आयुक्त बाजीराव भोसले यांनी संशयितांच्या चौकशीमध्ये नाशिक येथील रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची माहिती मिळवली. त्याअाधारे खंडणीविरोधी पथकाने पाथर्डी फाटा, चुंचाळे, वाडीवऱ्हे, इगतपुरी आणि वाडीवऱ्हे परिसरातील वस्तीवर शोधमोहीम राबवत नितेश भगवान आव्हाड ऊर्फ गोलू, अमोल अरुण कर्ले, आकाश चंद्रकांत चव्हाण ऊर्फ चिंग्या (तिघे रा. ठाणे), उमेश सुरेश वाघ (रा. चिंचोळे अंबड लिंकरोड), हरिश्चंद्र उत्तम मते (रा. वाडीवऱ्हे) यांना अटक केली. संशयितांकडून कार, व्हॅन, दुचाकी, पिस्तूल, चॉपर अादी प्राणघातक हत्यारे जप्त करण्यात अाली. ठाणे शहर पोलिस आयुक्त परमवीरसिंग, सहायक आयुक्त आशुतोष डुंबरे, पराग मणेर, नागेश लोहार, बाजीराव भोसले, भरत शेळके, राजकुमार कोथमिरे, ए.ए. कुऱ्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पाच काेटी रुपये गेले कुठे : कंपनीतीलसुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून नऊ काेटी रुपये पळविण्यात अाले हाेते. अाराेपींना जाताना सीसीटीव्हीही चाेरुन नेले हाेते. दरम्यान, यापैकी चार काेटी रुपये हस्तगत झाले असले तरी उर्वरित पाच काेटी गेले कुठे? याचा शाेध अाता पाेलिस घेत अाहेत.

काही अाराेपी फरार असल्याचा संशय
या दरोड्यातील संशयितांच्या सखोल चौकशीमध्ये नाशिक कनेक्शन उघड झाले. याअाधारे संशयितांची माहिती घेतली. या गुुन्ह्यात १५ ते १७ संशयित आहेत. चार वगळता इतर सर्व नाशिक शहर आणि ग्रामीण भागात राहणारे असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने सापळा रचून संशयितांना अटक केली. काही फरार आहेत. लवकरच संशयित पकडले जातील. बाजीरावभोसले, सहायक पाेलिस आयुक्त, ठाणे शहर

कंपनीच्या अाजी-माजी कर्मचाऱ्यांचाच कट
चेकमेट कंपनीत पूर्वी काम करणारा आकाश चव्हाण याने हा दराेड्याचा कट रचला होता. सध्या कंपनीत काम करणारा अमोल कार्ले याने नाशिक येथील गुन्हेगारांशी संपर्क साधून लुटीचे नियाेजन केले. पंधरा दिवसांपासून हा कट शिजत होता. कंपनीच्या कामगाराच्या मदतीने कंपनीवर दरोडा टाकून लुटलेली रक्कम पाथर्डी फाटा येथे ठेवली होती. या गुन्ह्यातील संशयित फरार आहेत. दोन पथकांकडून शोध सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...