आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅन्जिओग्राफीस नकार, छगन भुजबळ पुन्हा कारागृहात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई | जेजे रुग्णालयात अॅन्जिओग्राफी करून घेण्यास छगन भुजबळांनी नकार दिल्याने ४५ दिवसांच्या वास्तव्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड तुरुंगात होत आहे. मात्र त्यांना पुन्हा कारागृहात घ्यायचे का नाही याबाबत कोर्टाचे आदेश नसल्याची भूमिका कारागृह प्रशासनाने घेतल्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत भुजबळ कारागृहात परतले नव्हते. महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणी कोठडीत असलेल्या भुजबळांच्या वारंवार रुग्णालय वास्तव्यावर हरकत घेणारा अर्ज अंजली दमानिया यांनी विशेष न्यायालयात केला होता.
बातम्या आणखी आहेत...