मुंबई- आयपीएस अधिकारी आर.एस. शर्मा यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नेमणूक करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी सहा कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यातील चार कोटी रुपयांची रक्कम बहुचर्चित मुद्रांक घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीकडून भुजबळांनी स्वीकारलीही हाेती, असा सनसनाटी आरोप भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बाेलताना केला. याबाबतचे अापल्याकडे सर्व पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.
बनावट मुद्रांक घाेटाळ्याचा प्रमुख अाराेपी तेलगीशी संबंधांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गाेटे यांच्यावर विधानसभेत अाराेप केले. त्याला गाेटे यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी बाेलताना प्रत्त्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘अब्दुल करीम तेलगीबाबत कुणीतरी मला िवचारावे, यासाठी मी आठ वर्षे वाट पाहत होतो. आर. एस. शर्मा यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यासाठी भुजबळांनी ६ कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ४ कोटी रुपये तेलगीने भुजबळांना दिले,’असे सांगत गोटे यांनी एक कागदच उंचावून दाखवला.
छगन भुजबळ हे आधीच मनी लाँडरिंग व जमीन घोटाळ्यांच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. या नव्या अाराेपांमुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.
अाव्हाड-गाेटेंमध्ये चकमक
गुरुवारी विधानसभेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार जितेंद्र अाव्हाड व गाेटे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी दाेन्ही नेत्यांनी एकमेकांविराेधात अाराेप केले मात्र नंतर ते कामकाजातून वगळण्यात आले.