आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाॅम्बे हाॅस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची छगन भुजबळांना मुभा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत जामीन अर्ज केलेल्या माजी मंत्री छगन भुजबळांना सोमवारपर्यंत बाॅम्बे हाॅस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची मुभा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिली. त्यामुळे आता भुजबळांच्या जामीन अर्जावर सोमवारी पुन्हा सुनावणी हाेणार आहे.

न्या. रणजित मोरे यांच्यासमोर भुजबळांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी सुरू अाहे. ‘ईडी’ने आपल्याला बेकायदेशीर पद्धतीने अटक केली असून आपल्या अटकेनंतर तब्बल पंधरा दिवसांनी आपल्याला अटकेचे कारण सांगितले गेल्याचा दावा भुजबळांनी याचिकेत केला आहे. यावर ‘ईडी’ने आज पुन्हा एकदा भुजबळांनी अटकेसंदर्भात केलेला दावा चुकीचा असल्याचे सांगितले. आम्ही ‘काही दिवस भुजबळांची कस्टडी घेतली होती. मात्र त्यादरम्यान चार वेळा त्यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयानेच त्यांना ईडी कोठडी आणि न्यायालयीन कोठडी दिली होती. मग त्या वेळी भुजबळांनी आक्षेप का घेतला नाही?’ असा सवाल ईडीच्या वकिलांनी केला.

पंकज भुजबळ यांच्या अटकेला पुन्हा संरक्षण
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अामदार पंकज भुजबळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला. विशेष पीएमएलए न्यायालयात पुन्हा नव्याने अटकपूर्व जामीन अर्ज करणार असल्याने त्यांनी हा जुना अर्ज मागे घेतला आहे. मात्र नवा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करेपर्यंत किमान दोन आठवड्यांची मुभा आपणास द्यावी, अशी विनंती पंकज यांनी केली. त्यावर न्या. सांबरे यांनी पंकज यांच्या नवीन अटकपूर्व अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले आहेत. आता पीएमएलए कायद्याच्या कलम ८८ नुसार सत्र न्यायालयात नवीन जामीन अर्ज दाखल करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...