आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही\', भुजबळांना 2 दिवसाची ईडीची कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ईडीने सोमवारी रात्री अटक केल्यानंतर आज त्याचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. भुजबळांच्या अटकेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिले. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी भुजबळ यांना कोणत्या निकषावर अटक केली याचे सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भुजबळांच्या अटकेबाबत सरकारवर टीकास्त्र सोडले. विखे-पाटील म्हणाले, भुजबळ यांची ईडीने 11 तास चौकशी केली. मात्र, ईडीने त्यांना अटक करताना विधानसभा अध्यक्षांची परवानगी का घेतली नाही याचा जाब द्यावा. सरकारने सुडबुद्धीने ही कारवाई केली असल्याचे सांगत विधानसभेत आज प्रश्नोत्तरांचा तास रद्द करून भुजबळांच्या अटकेबाबत उत्तर द्यावे अशी मागणी विखे यांनी केली.
भुजबळांना दोन दिवसाची ईडीची कोठडी-
छगन भुजबळ हे चौकशीला सहकार्य करीत नाहीत. भुजबळांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर संशय आहे. मंत्रीपदाचा गैरवापर करून पैसा गोळा केल्याचा दावा ईडीने केला आहे. भुजबळ यांच्या कंपनीतील संचालक बनावट आहेत. त्यामुळे अधिक व पुढील चौकशीसाठी छगन भुजबळ यांना तीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी सेशन्स कोर्टाकडे केली. सुमारे दीड तास सुनावणी झाली. यावेळी भुजबळांनी भावूक होऊन आपली साक्ष मांडली. आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे भुजबळ यांनी पुन्हा एकदा सांगितले. अखेर सेशन्स कोर्टाने दोन दिवसाची ईडीची कोठडी सुनावणी आहे.
घोटाळेबाजांवर कारवाई होणारच, भुजबळांच्या अटकेचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन-
विधानसभेत भुजबळांच्या अटकेबाबत उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, भुजबळ यांच्या अटकेशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. तपास यंत्रणांनी त्यांना मिळालेल्या पुराव्यानुसारच कारवाई केली आहे. दुष्काळावर चर्चा करायची सोडून भुजबळ प्रकरणावर चर्चेची विरोधकांची मागणी दुर्देवी आहे. ईडी गेली अनेक महिने मनी लाँडरिंग प्रकरणाचा तपास करीत होते. त्यांना त्याबाबत काही तरी पुरावे आढळल्याशिवाय ते अटक कसे करतील. घोटाळेबाजांवर कारवाई होणारच, ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले व पुरावे आहेत त्यांच्याविरोधात कारवाई करायची नाही का मग? असा सवाल करीत मुख्यमंत्र्यांनी भुजबळांच्या अटकेचे समर्थन केले.

भुजबळ किमान तीन वर्षे तुरुंगात सडणार- सोमय्या
छगन भुजबळ यांना अटक झाल्याने माझ्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे मी मानतो. भुजबळांविरोधात माझ्याकडेही व तपास यंत्रणांकडे भरपूर पुरावे आहेत. भुजबळ आता किमान तीन वर्षे तुरुंगात सडतील अशी मला आशा आहे. सिंचन घोटाळा करणारे अजित पवार व सुनील तटकरेही लवकरच तुरुंगात दिसतील असे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिल्लीत बोलताना सांगितले. भुजबळ प्रकरणाचा किरीट सोमय्या यांनीच पाठपुरावा केला आहे.
राष्ट्रवादी आमदारांचे विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन-
छगन भुजबळ यांच्या अटकेचा निषेध म्हणून विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज सकाळीच विधानभवनाच्या पाय-यावर भुजबळांच्या समर्थनार्थ तर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले.
अजित पवार, तटकरेंनी मारली दांडी-
विधानसभेत भुजबळ प्रकरणावरून काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते गदारोळ घालत आहेत. सर्व चर्चा बाजूला ठेऊन भुजबळ प्रकरणावर चर्चा करा अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे विरोधक विधानसभा व विधानसपरिषदेत गदारोळ करीत आहेत. तर अध्यक्ष कामकाज रेटून नेत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यावर भुजबळांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. यावेळी अजित पवार व सुनील तटकरे यांनी मात्र दांडी मारल्याचे दिसून आले. विधानसभेतही जयंत पाटीलच किल्ला लढवत आहेत. तेथेही अजित पवार व तटकरे यांनी दांडी मारली आहे.
भाजपकडून अटकेचे समर्थन-
छगन भुजबळ यांनी झालेली अटक योग्य व कायदेशीर आहे असा पवित्रा भाजपने घेतला. भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत सांगितले की, भुजबळांची अटक योग्य आहे. त्यांनी काळा पैसा कमवत विदेशात पाठवला आहे. मुख्यमंत्री असताना लालू प्रसाद यादव, जयललिता यांना अटक होते तर साधे आमदार असलेल्या भुजबळांना अटक केले यात नवल काय आहे अशी आक्रमक भूमिका अनिल गोटे यांनी घेतली. दरम्यान, गोटेंच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अध्यक्षांनी 10 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
सेंट जॉर्जमध्ये वैद्यकीय तपासणी-
छगन भुजबळ यांची सोमवारची रात्र मुंबईतील ईडीच्या कार्यालयात गेली. आज दुपारी 3 वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयातून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सेंट जार्ज रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर चारच्या सुमारास कोर्टात हजर करण्यात आले. अर्थातच ईडी त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे. तर, भुजबळांचे वकिल जामिनासाठी अर्ज दाखल करतील. त्यामुळे कोर्ट काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.
भुजबळ समर्थक रस्त्यावर, पवारांचे शांततेचे आवाहन-
छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ व अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. येवला, लासलगाव, नांदगाव व नाशिक पट्ट्यात बंदची हाक देण्यात आली आहे. भुजबळ समर्थक रास्तो रोको करीत आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांनी शांत राहावे, जाळपोळ अथवा हिंसात्मक कृत्य करू नये असे पक्षाध्यक्ष पवारांनी आवाहन केले आहे. छगन भुजबळांनी काहीही चुकीचे केले नाही. भाजपचा एक खासदार (किरीट सौमय्या) आणि मुख्यमंत्र्यांनी हे षडयंत्र रचले आहे. 2012 पासूनच त्यांचा हा प्रयत्न होता मात्र, आम्ही व आमचा पक्ष कायदेशीर मार्गाने या सा-या प्रकाराबात नेटाने लढा देऊ असे सांगत भुजबळांची पाठराखण केली आहे.
पुढे पाहा, विधानसभेतील पडसादाची छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...