आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ गोत्यात, महिन्याभरात आरोपपत्र दाखल होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- निधीचा गैरवापर आणि जमीन बळकावल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्ध महिनाभरात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. एसीबी तसेच सीबीआयने चौकशीचा अहवाल सादर केला. तसेच तीन प्रकरणांमध्ये एक महिन्यात आरोपपत्र तर अन्य एका प्रकरणांत चौकशी सुरू असून दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल केले जाईल अशी माहिती न्यायालयाला दिली तर भुजबळ आणि कुटुंबीय तपासात सहकार्य करीत नसल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला.
न्या. व्ही. एम. कानडे- रेवती मोहिते-डेरे यांच्या न्यायपीठाने भुजबळ कुटुंबीयांविरुद्ध केलेल्या चौकशीचा अहवाल आठवड्यांत सादर करावा, असे निर्देश एसीबी अंमलबजावणी संचलनालयाला दिले. महत्त्वाच्या पदांवरील लोकांविरुद्ध गंभीर आरोप असलेल्या अशा प्रकरणांत देखरेख महत्त्वाची असल्याचेही कोर्टाने सांगितले.
महाराष्ट्र सदनाबरोबरच अन्य कामांत कंत्राटदारांकडून लाच घेतल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढतच आहेत. तपास करणार्‍या यंत्रणांना चौकशीत सहकार्य करीत नसतील तर त्यांच्या विरोधात कारवाई करा आणि अहवाल सादर करा असेही न्यायालयाने म्हटले आहे. सर्वच प्रकरणांमध्ये आरोपी सारखे आहेत तर प्रत्येक प्रकरणामध्ये स्वतंत्र एफआयआर कशासाठी दाखल करता असा प्रश्‍न खंडपीठाने उपस्थित केला.