आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chaggan Bhujbal New Photo On Wheelchair Become Viral On Social Media.

जेलमध्ये जाताच अशी झाली अब्जाधीश छगन भुजबळांची अवस्था, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छगन भुजबळ यांना आज दुपारी सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. - Divya Marathi
छगन भुजबळ यांना आज दुपारी सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सध्या मनी लाँडरिंगप्रकरणी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. मागील आठवड्यापासून त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले होते. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून, आज त्यांना पुन्हा जेलमध्ये हलविण्यात आले. दरम्यान, छगन भुजबळ यांचा सेंट जॉर्जमध्ये टिपलेला फोटो सध्या भलताच चर्चेत आला आहे. सोशल मिडिया व व्हॉट्सअॅपवरही तो जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोत छगन भुजबळ थकलेल्या अवस्थेत दिसत आहेत.
मागील आठवड्यात भुजबळांना सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखू लागल्याने व ब्लडप्रेशर वाढल्याने त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. ह्दयाचा ईसीजी व टू डी इको करण्यासाठी भुजबळांना आणले असता त्यावेळी हा फोटो काढल्याचे बोलले जात आहे.
छगन भुजबळांना रूग्णालयातून सुट्टी, आर्थर रोड जेलमध्ये पुन्हा रवानगी!
मनी लाँडरिंगप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना आज दुपारी सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याने सेंट जॉर्ज रुग्णालयातून आज दुपारी दोनच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज दिला गेला. भुजबळांची आर्थर रोड तुरुंगात पुन्हा रवानगी करण्यात आली. भुजबळ यांना 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येईल.
पुढे पाहा, अब्जाधीश छगन भुजबळ यांचा अतिशय विदारक फोटो... असे बसले होते रुग्णालयात.... वाचा त्यांची कुठे आणि किती आहे मालमत्ता...