आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ म्हणतात, कोण हा चिखलीकर? ; डायरीच नाही, तर माझे नाव त्यात कसे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 500 कार्यकारी अभियंते आहेत. त्यामुळे कोणत्याही अभियंत्याच्या लाचखोरीला मी कसा जबाबदार ठरतो. अभियंत्याच्या भ्रष्टाचाराचा संबंध माझ्याशी का जोडता, असा संतप्त सवाल करत ‘आपण कोणत्याही चिखलीकरला ओळखत नाही’, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी केला.

मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी ‘चौथा स्तंभ’ या पत्रकार पुरस्काराचे वितरण भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘भ्रष्टाचार तर सर्वच विभागात आहे. मात्र बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा गवगवा अधिक केला जातो. माझे नाव घ्यायला इतरांना आवडते, त्याला मी तरी काय करु’, अशी कोपरखळी भुजबळ यांनी मारली.
डायरीमधील नोंदीविषयी छेडला असता, ते म्हणाले, पोलिसांना तपासामध्ये अशी कोणतीही डायरी सापडली नाही. मग त्यात माझे नाव कसे आहे म्हणता. डायरी आणि त्यातील माझे नाव, म्हणजे माध्यमांची बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे.

माझे हितशत्रू प्रचंड आहेत. त्यामुळे अद्याप माझे नाव टू जी किंवा कोळसा घोटाळ्यात कसे काय गोवले नाही, याविषयी खरं तर मला आश्चर्य वाटत. चिखलीकर प्रकरणाची चौकशी एसीबी, ईडी करत आहे. त्यामुळे सत्य लवकरच बाहेर येईल, असे भुजबळ म्हणाले.

चिखलीकर आणि वाघ यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशीचे आदेश, पतीला पाहताच पत्नीला रडू कोसळले व चिखलीकरच्या संपत्तीबाबतची माहिती वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...