आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chaggan Bhujbal Says I M Innocent In Corruption Cases

किरीट सोमय्याला करू दे टँव टँव.. मी मात्र निर्दोषच- छगन भुजबळांची दर्पोक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माझ्यावर सुरू असलेल्या चौकशीत नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाने अँटी करप्शन ब्युरोला (एसीबी) दिलेल्या सविस्तर पत्रानुसार मला क्लीन चिट दिल्याचे स्पष्ट होतेय. त्यामुळे खासदार किरीट सोमय्याने कितीही टँव टँव करू देत, प्रत्यक्षात मी निर्दोषच आहे अशी दर्पोक्ती माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली केले.
भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र सदन किंवा अंधेरीचे आरटीओचे कार्यालय असू दे, यात माझी एकाही फाईलवर स्वाक्षरी नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात आले आहे. या सर्वच परवानग्या मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनेच दिल्या गेल्या आहेत. शिवाय, काही ठिकाणी संबंधित खात्यांच्या सचिवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे मी एकही रुपयाचाही अपहार केला नसल्याचे पहिल्यापासून ओरडून सांगत होतो. परंतु, कोर्टात याबाबत जनहित याचिका दाखल झाली होती. त्यामुळे या तक्रारीवरून कोर्टाने चौकशीचे आदेश दिले. चौकशीत बांधकाम विभागाला काही प्रश्न विचारले होते. त्यानुसार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीनंतर संबंधित सचिवांनी त्याचे शासकीय पत्र काढून ते एसीबीला सादर केले. त्यात विचारलेल्या प्रश्नांबाबत विशिष्ट पान नंबरवर प्रश्न आहेत. त्यापुढील पान नंबरवर उत्तरे आणि त्यापुढील पानांवर अँटी करप्शनचा मसुदा असल्याचे नमूद केले आहे. हे पत्र म्हणजे पूर्णपणे क्लीन चिट नाही. पण, जवळपास क्लीन चिट असल्यागतच आहे, असे भुजबळांनी सांगितले.
अंधेरीत एफएसआयचा मुद्दा
अंधेरीतील आरटीओच्या इमारतीत एसआरए योजना आहे. त्यामुळे ठेकेदारालाही पैसे देण्याचा प्रश्नच नाही. त्याला टीडीआर देण्याची व्यवस्था असल्याने एक रुपयाही देण्यात आलेला नाही. पोलिस आणि आरटीओनेही तसे कळविले आहे.
राष्ट्रपती भवननंतर दर्जेदार महाराष्ट्र सदन
महाराष्ट्र भवनच्या दर्जाबाबत कोणीही बोलूच शकत नाही. राष्ट्रपती भवननंतर सर्वात प्रशस्त आणि उत्तम असे हे सदन आहे. सप्ततारांकित हॉटेलांप्रमाणेच आहे. फाऊंटेन आहे. स्वतंत्र ब्रिसलेरीचा प्लँट आहे. नळाला हे पाणी येते. म्हणे दर्जा खराब, त्याच्या सर्वच परवानग्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मी केवळ ते करून घेतले असल्याचे भुजबळांनी या वेळी स्पष्ट केले.