आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chaggan Bhujbal Wrote A Letter To Cm Fadnavis From Jail, Read It..

भुजबळांचे जेलमधून मुख्यमंत्र्यांना पत्र, काय म्हणाले पत्रात वाचा जसेच्या तसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छगन भुजबळ - Divya Marathi
छगन भुजबळ
मुंबई - महाराष्ट्र सदन घाेटाळा, मनी लाॅडरिंगप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगात दुष्काळाची चिंता सतावत आहे. नाशिकमधील मांजरपाडा वळण योजनेचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्यासाठी भुजबळ यांनी तुरुंगामधून थेट मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच अक्षरामध्ये पत्र लिहिले आहे.

या पत्राच्या प्रती विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यासह रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे व जयंत पाटील यांनाही पाठवल्या. पत्रात म्हटले अाहे, की ‘आपणास माहीत आहे मी तुरुंगात असून माझ्या 30 वर्षांहून अधिक अशा विधीमंडळाच्या कारकीर्दीत कधीच अधिवेशन चुकवलेले नाही. राज्यासमाेर सध्या अनेक प्रश्न असून त्यापैकी काही मानवनिर्मित, तर काही निसर्गनिर्मित आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे कळते. मात्र, जे पाणी प्रकल्प कामासाठी थोडक्यात अडकून पडले असून ते तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. मांजरपाडा या योजनेचाही या अडकलेल्या योजनांमध्ये समावेश आहे.

मांजरपाडा वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्याच्या गुजरातच्या हद्दीवरील पाणलोट क्षेत्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे गुजरातकडे आणि अरबी समुद्रात वाहून जाणारे ८४५ दशलक्ष घनफुट पाणी अडवून हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवले जाणार आहे. यातील १०० दशलक्ष घनफुट पाणी स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सध्या ८.९६ किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी ९० टक्के आणि ३.२० किलोमीटर लांबीच्या उघड्या चराचे पूर्ण काम झाले, तर धरणाचे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सुधारित प्रशासकीय मान्यतेवाचून हे काम ऑक्टोबर २०१४ पासून बंद पडले असून ते तत्काळ सुरू करा’, अशी मागणी पत्राद्वारे भुजबळांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले पत्र
‘अधिकारी ऐकत नाहीत, असे एकदा आपण म्हणाला होता. हे पटत नाही. आपण सांगितलेल्या अनेक गोष्टी अधिकारी निमूटपणे करतात. आपण सांगितले तर मांजरपाड्याचे कामही सुरू होईल’, अशा शब्दांत भुजबळांनी पत्रातूनही फडणवीसांना टोला मारण्याची संधी सोडली नाही.
पुढे पाहा व वाचा, भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले जसेच्या तसे पत्र...