आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. दि.1 जुलै 2017 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा या दुहेरी उद्देशाने गठीत करण्यात आलेल्या राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी

सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांची ‍नियुक्ती करण्यात आली.

 

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आलेली जबाबदारी आणि कामकाजाचे स्वरूप तसेच अध्यक्षांना केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगामध्ये करावे लागणारे राज्याचे प्रतिनिधीत्व या सर्व बाबींचा विचार करून शासनाने राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदास समकक्ष दर्जा दिला आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...