आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्यभूमी तिकिटाला अखेर मान्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर चैत्यभूमी स्मारकाचे टपाल तिकीट काढण्यास अखेर केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने मान्यता दिली आहे.त्यामुळे सामाजिक संघटना आणि पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या गेल्या सव्वा वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. मात्र, आता टपाल विभागाकडून छापण्यात येणारी ही टपाल तिकिटे कुणी खरेदी करायची हा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने ही तिकिटे खरेदी करावीत, अशी शिफारस ढोबळे यांनी सामाजिक न्याय विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

डॉ. आंबेडकरांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमीचे टपाल तिकीट काढले जावे, असा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने मांडला होता. या प्रस्तावाचा मंत्रालयीन आणि प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून त्याला केंद्राकडे पाठवण्यात लक्ष्मण ढोबळे यांचा महत्वाचा वाटा आहे. हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर सुमारे आठ महिने मंत्रालयातील विविध खाती आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात धूळ खात पडून होता. हा प्रस्ताव डिसेंबर महिन्यांत केंद्राकडे पाठवल्यानंतर केंद्राकडून मान्यता मिळाली.