आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन, खा. राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सरकारची कर्जमाफी अमान्य करत शेतकरी सुकाणू समितीने सोमवारी राज्यभरात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले. शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांब्यात रास्तारोको करण्यात आला. परभणी-गंगाखेड,वसमत, पाथरी, जिंतूर या प्रमुख मार्गावर आंदोलन झाले.
 
उस्मानाबाद जिल्ह्यात चक्काजाममुळे प्रमुख मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. कांद्याला हमीभाव, सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग  अंमलबजावणी करा अशा विविध मागण्यासाठी नाशिक जिल्ह्यात शेतकरी व सुकाणू समितीतील सदस्यांनी पुणे महामार्गावरील पळसे, त्रंबकेश्वर मार्गावर महिरावणी, तर औरंगाबाद महामार्गावर चांदोरी येथे निदर्शने केली.

अहमदनगरच्या अकोले येथील आंदोलनात सुकाणू समितीचे सदस्य अजित नवलेंसह १० हजार विद्यार्थी व ५ हजार शेतकरी सहभागी झाले. सरकारने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात. दखल घेतली नाही, तर पुढील आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानसमोर करू, असा इशारा सुकाणू समितीचे सदस्य अजित नवले यांनी दिला. वर्ध्यात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.  दरम्यान राज्यातील इतर शहरातही आंदोलन करण्यात आले.

पुढील स्‍लाइडवर... कर्जमाफी म्हणजे घरात नवरा-बायकोचे भांडण लावण्याचे काम
 
 
बातम्या आणखी आहेत...