आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाल होत असल्याने जनता एसटी कर्मचाऱ्यांना ठोकून काढेल; चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील. - Divya Marathi
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील.
मुंबई- एस. टी. बसच्या संपामुळे जनतेचे हाल होत आहेत. जनता अशा कर्मचाऱ्यांना ठोकून काढेल, असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. संपाबाबत नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेण्यास, चर्चा करण्यास सरकार समर्थ असल्याचे सांगितले. मात्र  शासकीय कर्मचाऱ्यांना संप करण्याचा आणि जनतेला वेठीस धरण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे मत त्यांनी मांडले.
 
राज्याची लाइफलाईन अशी ओळख असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग द्यावा आणि इतर अनुषंगिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप सुरू केला आहे. त्यामुळे राज्यात सगळ्या बसस्थानकावर शुकशुकाट आहे. राज्य परिवहन महमंडळाच्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेकांना आपला प्रवासाचा बेत रद्द करावा लागला आहे तर काही ठिकाणी खासगी वाहनांमुळे लोक प्रवास करत आहेत. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...