आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूरचे नाव बदलण्याचा विचार केला होता!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि नवाब सैफ अली खान यांचा मुलगा तैमूरच्या नावावरून मोठे वादंग निर्माण झाल्यानंतर आपण त्याचे नाव बदलण्याचा विचार केला होता. मात्र करिनाने तसे न करण्यास सांगितले’, अशी कबूली अभिनेता सैफ अली खान याने नुकतीच एका मुलाखतीत दिली.
 
सैफ म्हणाला, शाळेत तैमूरला या नावाने कोणीही चिडवू नये, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आपण त्याचे नाव बदलण्याची तयारीही केली होती. मात्र, त्यासाठी पत्नी करिना राजी नव्हती. त्यामुळे ऐनवेळी हा निर्णय बदलल्याचे सैफने सांगितले. करिनाने गेल्यावर्षी २० डिसेंबर रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर बाळाचे नाव तैमूर असे ठेवण्यात आले. 
याबाबत सैफ आणि करिना यांनी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना माहिती दिली. मात्र, त्यानंतर दोघांवर या नावावरून टीकेची झोड उठली. अनेकांनी त्यांना तैमूर नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. “लोकांच्या मनात तुझ्याविषयी आदर आहे आणि तू तुझ्या मतावर ठाम राहायला हवे’, असे करिनाने आपल्याला सांगिल्याचे सैफने सांगितले. 
 
लोकांसाठी नाही, तर त्याला शाळेत कोणी चिडवू नये, म्हणून मला त्याचे नाव बदलायचे होते, असे त्याने सांगितले.  दरम्यान, अजूनही त्याचे नाव बदलण्याबाबत आपण विचार करत आहोत, असेही त्याने सांगितले.   
 
सैफला ‘रंगून’कडून अपेक्षा  
विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन असलेला रंगून हा चित्रपट शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना रनोट यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाकडून सैफला खूप अपेक्षा आहेत. चित्रपटात सैफने कंगनासोबत अनेक बोल्ड दृश्ये दिली आहेत. त्यामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाआधीच चर्चा झाली आहे. हा चित्रपट चांगला व्यवसाय करेल,  असा विश्वास  सैफने व्यक्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...