आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Changing Life Style Make India As Centre Of Heart Attack And Dibetis

बदलत्या जीवनशैलीमुळे भारत ठरतोय हृदयविकार आणि मधुमेहाचे प्रमुख केंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आधुनिक काळाच्या वेगाशी स्पर्धा करताना होणारी धावपळ व तणाव गंभीर समस्या ठरत आहे. यामुळे भारत आज हृदयविकार व मधुमेह यांसारख्या विकारांचे जागतिक स्तरावरील प्रमुख केंद्र होत चालले असल्याचे मत निरोगी राहण्याची गुरुकिल्ली सांगणा-या आरोग्यतज्ज्ञ नमिता जैन यांनी येथे आयोजित एका कार्यशाळेत मांडले.
मुंबई प्रेस क्लबने पत्रकारांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. हल्लीच्या जीवनात अपचन, पित्ताचे प्रमाण वाढत असल्याबद्दलही जैन यांनी चिंता व्यक्त केली. जेवणातील बदलत्या सवयी आणि आहारात विदेशींचे अनुकरण घातक असल्याचेही त्या म्हणाल्या.
हृदयविकाराचे गांभीर्य
30 वर्षांच्या आतील रुग्णसंख्येत वाढ
9.5% रुग्ण चाळिशीच्या आतील
03% रुग्ण तिशीच्या आतील
10% पुरुषांतील हार्टअटॅक पंचेचाळीसच्या आत
(हार्वर्ड अहवाल -नोव्हेंबर 2009)
कारणे काय?
०धूम्रपान हा हृदयविकाराला कारणीभूत ठरणारा सामायिक घटक.
०दैनंदिन जीवनात अधिकाधिक बैठे काम.
०वाढलेले वजन, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण.
०आनुवंशिकता हा घटकही हृदयविकारात महत्त्वाचा ठरत आहे.
हृदयरचना शास्त्रविषयक जागतिक काँग्रेसनुसार 1990 मध्ये भारतातील 24 टक्के मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे स्पष्ट झाले होते. हे प्रमाण 2020 मध्ये 40 टक्क्यांवर पोहोचेल.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार सध्या जगभरात मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांची संख्या 20 कोटी असून एकट्या भारतात ही संख्या
5 कोटी आहे.