आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charactor Certificate Compulsory To Autorickshaw,taxi Drivers Raote

रिक्षा, टॅक्सीचालकांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देण्याची सक्ती- रावते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईसह संपूर्ण राज्यातील टॅक्सी, ऑटो रिक्शा, बस चालकांचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासूनच त्यांना नोकरी देण्याबाबत परिवहन विभाग विचार करीत आहे. सरकारतर्फे तशी एखादी योजना तयार करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

नवी दिल्लीत उबेर या वेबसाइटवरून टॅक्सी बुक केलेल्या युवतीवर चालकाने अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सध्या त्यावरून देशभर वातावरण तापले असून, संसदेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या वेबसाइटवर बंदी घातली आहे.

मुंबईतील महिलांच्या सुरक्षेबाबत काय? या प्रश्नावर रावते म्हणाले की, ‘मुंबईत अजून तरी असा अत्याचाराचा प्रकार झाला नाही. मात्र भविष्यात होऊ नये म्हणून आम्ही पावले उचलणार आहोत. यापुढे राज्यातील सर्व ऑटो, टॅक्सी आणि बस चालकांचे चारित्र्य प्रमाणपत्र घेऊनच त्यांना नोकरी द्यावी असा निर्णय घेण्याचा विचार आम्ही करीत आहोत. कोणीही कोठूनही येतो आणि वाहन चालविण्याचा परवाना घेऊन काम सुरु करतो. त्याचा इतिहास कोणी तपासून पाहात नाही त्यामुळे गुन्हा करून तो पळूनही जाऊ शकतो. अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक असून त्याबाबत काय करता येईल यासाठी एक बैठक लवकरच घेऊ असेही रावते यांनी सांगितले.