आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात 1,643 पानांचे आरोपपत्र दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इक्बाल कासकरला त्याच्या बहिणीच्या घरातून अटक करण्यात आली होती. - Divya Marathi
इक्बाल कासकरला त्याच्या बहिणीच्या घरातून अटक करण्यात आली होती.

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर विरोधात 1,643 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एका बिल्डरकडुन खंडणी मागितल्याप्रकरणी कासकरसह त्याच्या 6 साथिदारांविरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे. ठाणे पोलिसांनी 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील नागपाडा येथून इक्बालला अटक केली होती. 

 

चार्जशीटमध्ये काय आहे?
- कासकरच्या वकिलाने त्याच्याविरोधात असलेले आरोपपत्र हटविण्याची मागणी केली होती.
- पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांनी ठाणे परिसरातील बिल्डर आणि उद्योगपतींकडून 90 लाखाची खंडणी घेतली आहे. 

- दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर हे आरोपी काम करत असल्याचा पोलिसांना संशय़ आहे.
- ठाणे पोलिसांच्या दाब्यानुसार इक्बाल कासकर हा skype च्या माध्यमातून दाऊदच्या संपर्कात होता. 
- इक्बाल सोबतच त्याचे साथीदार मुमताज शेख आणि इसरार सय्यद यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मटका किंग पंकज गांगरलाही पकडण्यात आले. तर आरोपी शम्मी आणि गुड्डू फरार आहेत. 

 

इक्बालवर दाखल असलेले तीन खटले
पहिला खटला
- 18 सप्टेंबर रोजी कासकरला ठाणे पोलिसांनी अटक केली. इक्बालवर एका बिल्डरकडून जबरदस्तीने खंडणी बसूल् केल्याचा व धमकी दिल्याचा आरोप आहे. मुंबईतील त्याच्या बहिणीच्या घरातून त्याला अटक करण्यात आली. इक्बाल शिवाय 4 आणखी लोकांना अटक करण्यात आली होती. 

- कासकरने बिल्डरकडून 4 फ्लॅट घेतले होते व आणखी पैसे मागत होता. 

 

दुसरा खटला
- इक्बालवर दुसरा गुन्हा 24 सप्टेंबर रोजी मुंबईतील 2 सोनार गौतम जैन आणि त्यांचे पार्टनर निर्मल यांच्या फिर्यादीवरुन दाखल करण्यात आला. कासकरने या दोघांना मुमताज नावाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून पैसे मागितले. त्याच्या 8 लाखाचे सोने लुटल्याचाही आरोप आहे.

 

तिसरा खटला
- इक्बाल कासकरने एका बिल्डरवर 3 कोटी रुपये देण्यासाठी दबाब टाकला. तक्रार देणाऱ्या बिल्डरने 2015 मध्ये गोराई येथे 38 एकर जमीन खरेदी केली होती. त्याने जमीन मालकाला टोकन म्हणून 2 कोटी रुपये दिले होते आणि कागदपत्रे तयार केली होती. काही दिवसांनी जमीन मालकाने या जमिनीची दुप्पट किंमत मागितली. त्यामुळे बिल्डरने याविरोधात कोर्टात दावा दाखल केला. 

- आरोपानुसार जमीन मालकाने बिल्डरवर दबाब टाकण्यासाठी इक्बाल कासकरची मदत घेतली. त्यानंतर इक्बाल कासकरने बिल्डरला धमक्या देणे सुरु केले. 

 

पहिलीही झाली आहे अटक
- यापूर्वी इक्बालवर मुंबईतील एका बिल्डरचे 4 फ्लॅट बळकविल्याचा आणि 2 सोनारांकडून कोट्यवधींचे दागिने लुटल्याचा आरोप आहे.

- इक्बालला 3 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्यावर सलीम शेख नावाच्या रिअल इस्टेट एजंटाने 3 लाख रुपये मागितल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप लावला होता. इक्बालला 2003 मध्ये दुबईहून प्रत्यार्पण करुन आणण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर खटलाही चालविण्यात आला पण पुराव्यांअभावी त्याची मुक्तता करण्यात आली.  

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...