आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charitable Hospitals Checking Up Next Three Month

धर्मादाय रुग्णालयांची होणार तपासणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरिबांसाठी खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने मुंबईतील सर्व रुग्णालयांच्या तपासणीची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम दर तीन महिन्यांनी राबवण्यात येणार असून यामध्ये दोषी आढळणा-या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

धर्मादाय कायद्याअंतर्गत येणा-या रुग्णालयांना सरकारकडून विविध सवलती दिल्या जातात. पण अनेकदा गरीब रुग्णांसाठी असलेल्या 20 टक्के राखीव खाटा त्यांना उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. त्याची दखल घेऊन धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीतर्फे ही पाहणी सुरू करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले. या समितीच्या पाहणीतून निघणारे निष्कर्ष पाहून गरिबांना सेवा न देणा-या रुग्णालयांवर कारवाईही केली जाऊ शकते, असे शेट्टी यांनी सांगितले.