आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मादाय रुग्णालयांनी निकष बसवले धाब्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईत 53 धर्मादाय रुग्णालये आहेत, मात्र त्यातील केवळ 11 रुग्णालयांनीच गरीब रुग्णांसाठी निर्धारित केलेल्या निकषांचे पालन केले असल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी याबाबत उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर निवेदन करताना शेट्टी यांनी वरील माहिती दिली. शासनाने या धर्मादाय रुग्णालयांना सवलतीच्या दरात जागा, वीज व पाणी दिले आहे. त्यामुळे 10 टक्के बेड दारिद्र्यरेषेखालच्या रुग्णांना विनामूल्य तर 10 टक्के बेड गरीब रुग्णांना सवलतींच्या दरात उपलब्ध करून देणे त्यांच्यावर बंधनकार असल्याचा मुद्दा विनोद तावडे मांडला. आरक्षणाची तरतूद न करणा-या या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या दिवाकर रावते यांनी केली.