आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charles Correa, Iconic Indian Architect, Dies At Age 84

\'नवी मुंबई\'चे निर्माते व ख्यातनाम आर्किटेक्चर चार्ल्स कोरिया यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- चार्ल्स कोरिया... - Divya Marathi
फाईल फोटो- चार्ल्स कोरिया...
मुंबई- ख्यातनाम वास्तुरचनाकार, शहर नियोजनकार चार्ल्स कोरिया यांचे मुंबईत मंगळवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. नवी मुंबई शहराचे निर्माते अशी चार्ल्स कोरिया यांची ओळख होती. नवी मुंबई शहराची उभारणी करताना सीटी प्लॅनर व प्रमुख वास्तुरचनाकार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सिकंदराबादमध्ये 1 सप्टेंबर 1930 रोजी जन्मलेल्या कोरिया यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. वास्तुरचना क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे कोरिया यांना 1972 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वास्तुरचना क्षेत्रातील मातब्बरांपैकी एक असलेल्या चार्ल्स कोरिया यांना 2006 साली त्यांना पद्मविभूषणाने गौरविण्यात आले होते.
नवी मुंबई, बेलापूर येथील आर्टिस्ट व्हिलेज कलाग्राम याचे डिझाइन कोरिया यांनीच केले होते. पुण्यातील इंटर यूनिवर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी एंड एस्ट्रोफिजिक्सच्या इमारतीचे डिझाईन त्यांनीच केले होते. कोरिया यांनी अहमदाबादमधील साबरमती आश्रम, जयपूर येथील जवाहर कला केंद्र, दिल्लीतील ब्रिटिश काऊंन्सिल, भोपाळमधील भारत भवन, विधानसभा भवन, गोव्यातील कला अकादमीची इमारत अशा अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली होती.
दिल्ली, मुंबई अहमदाबाद आणि बंगळुरु येथील अनेक बहुआयामी इमारतींचे त्यांनी डिझाईन केले होते. परदेशातील काही महत्त्वाच्या इमारतीचे डिझाईन त्यांनी बनविले होते. यात कॅनडातील टोरंटो शहरातील इस्माइली सेंटर, बोस्टन येथील एमआयटीच्या ब्रेन सायन्स सेंटरचा समावेश आहे.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, चार्ल्स कोरिया यांनी डिझाईन केलेल्या इमारतीचे नमुने...