आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाच्या आदेशामुळेच रजनीकांत, गुलजार, बिग बींना डावलून चौहानांची FTII मध्ये निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्या दिग्गजांना डावलून मोदी सरकारने गजेंद्र चौहानांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी फारशी ख्याती नसलेले अभिनेते गजेंद्र चौहान यांची वर्णी लावली आहे. - Divya Marathi
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्या दिग्गजांना डावलून मोदी सरकारने गजेंद्र चौहानांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी फारशी ख्याती नसलेले अभिनेते गजेंद्र चौहान यांची वर्णी लावली आहे.
मुंबई/पुणे- दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, अनुपम खेर, प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल, चित्रपट निर्माते अदुर गोपालकृष्णन, प्रदीप सरकार आणि विधू विनोद चोप्रा आणि गीतकार गुलजार अशा रथी-महारथींना डावलून केंद्र सरकारने फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी फारशी ख्याती नसलेले अभिनेते गजेंद्र चौहान यांची वर्णी लावल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सल्ल्यानुसारच मंत्री राज्यवर्धन राठौर यांनी चौहानांच्या नावाची माहिती आणि प्रसारण मंत्री अरूण जेटलींकडे शिफारस केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चौहान यांची निवड पूर्णपणे योग्य नसली तरी सरकार आता या निवडीवरून मागे हटणार नाही अशी भूमिका अरूण जेटलींनी घेतल्याने या हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप सरकार चौहानांच्या निवडीसाठी एवढे आग्रही का आहे असा सवाल या क्षेत्रातील मंडळी आता विचारू लागली आहेत.
गेल्या वर्षी देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्या खात्याचे राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदासाठी नावांची एक यादी पाठवली होती. त्यात चित्रपट निर्माते अदुर गोपालकृष्णन, दिग्दर्शक श्याम बेनेगल, अभिनेते अनुपम खेर यांच्या नावांचा समावेश होता. मात्र, यातील नावे सरकारच्या पसंतीस पडली नाहीत. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आणखी काही नावांची दुसरी यादी राज्यमंत्र्यांना सादर करण्यात आली होती. त्यात अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, चित्रपट निर्माते प्रदीप सरकार आणि विधू विनोद चोप्रा यांच्या नावाचा समावेश होता.
मात्र केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना पाठवलेल्या यादीत राज्यमंत्री राठोड यांनी गजेंद्र चौहान यांचे नाव घुसडवले. यासाठी भाजप व संघाच्या पातळीवर वरील 8 रथी-महारथींच्या नावावर फुली मारून महाभारतातील ‘युधिष्ठिर’ म्हणजेच गजेंद्र चौहान यांची निवड करण्याचे आदेश दिले गेले. अखेर मे 2015 मध्ये अरूण जेटली यांनी चौहान यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले व काही दिवसात घोषणाही झाली. वरील रथी-महारथींना डावलून चौहानांच्या निवडीमागे राज्यवर्धन राठोड यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे समोर येत आहे. माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राठोड यांनी सरकारबाहेरील लोकांशी सल्लामसलत करून चौहान यांचे नाव यादीत समाविष्ट करून त्याला मंजुरी मिळवली असा आरोप केला जात आहे.
पुढे वाचा, अनुपम खेर, ऋषी कपूर, अमोल पालेकर यांचा विरोध तर गजेंद्र चौहान उवाच!...