मुंबई - कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’ चित्रपटात अभिनेत्री मीनाकुमारी यांनी घातलेल्या दागिन्यांना ऐतिहासिक मूल्य असताना त्यांचा व्यवहार करताना
आपली अमृत मंगनानी या उद्योजकाने फसवणूक केल्याची तक्रार अमरोहींचा मुलगा ताजदार यांनी दाखल केली आहे. यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने मंगनानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ताजदार यांच्यामते, या व्यवहारात केवळ ३७ कोटींचीच फसवणूक झाली नाही, तर या दागिन्यांच्या ऐतिहासिक मूल्याचाही अवमान झालेला आहे. माझ्या वडिलांच्या दुस-या पत्नीला यातील काही दागिने देण्यात आले होते आणि काही मीनाकुमारीस देण्यात आले होते. ‘चलते चलते’ या गाण्यात मीनाकुमारीने घातलेले हे दागिने असून उद्योजक मंगनानी यांनी ते गैरव्यवहार करून मिळवले आहेत, असेही ताजदार यांचे म्हणणे आहे. ते परत मिळवण्यासाठी ताजदार यांचे प्रयत्न सुरू आहेत. मंगनानी यांनी पोकळ आश्वासने देत फसवणूक केल्याचीही ताजदार यांची तक्रार आहे.