आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरची मैत्री विवाहितेला पडली महागात, अश्लील छायाचित्रे काढून उकळले पैसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फेसबुकवरून तरूणाशी वाढविलेली ओळख व त्यातून झालेली मैत्री मुलूंडमधील एका 35 वर्षीय विवाहित महिलेला चांगलीच महागात पडली आहे. एका 23 वर्षीय तरूणाने या विवाहितेवर बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढली व नंतर ही छायाचित्रे पतीला दाखविण्याची भीती दाखवत लाखो रूपये उकळल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी मुलूंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, धार्मिक सोमय्या (23) याला अटक केली आहे. सदर गुन्हा कुर्ला परिसरात घडला असल्याने मुलूंड पोलिसांनी पुढील तपास विनोबा भावे नगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक सोमय्या हा मुलूंड पश्चिम परिसरात आपल्या कुटुंबियासह राहतो. त्याच्या वडिलांचा गारमेंटचा व्यवसाय आहे त्यांना धार्मिक मदत करतो. सहा महिन्यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून संबंधित महिलेशी धार्मिकची ओळख झाली. कालातंराने या दोघांत मैत्री झाली व पुढे त्यातूनच महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. यासाठी तो धार्मिक संबंधित महिलेला कुर्ला येथे भेटण्यासाठी बोलवत असे. तेथील लालबहाद्दुर शास्त्री मार्गावरील हॉटेल दुर्गामध्ये तो भेटत असे. यादरम्यान धार्मिकने महिलेसोबत अश्लील फोटो काढले.
पुढे वाचा, महिलेला विश्वासात घेऊन लुटले दीड लाख रूपये...