आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत डोंबिवलीजवळ केमिकल टॅंकरच्या भीषण स्फोटात 4 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डोंबिवलीमध्ये कल्याण-शीळ रस्त्यावरील दवडीनाका परिसरातील गायकर कंपाऊंड येथे भंगाराच्या डपिंगवर उभा असलेल्या केमिकल टँकरमध्ये भीषण स्फोट होऊन चार जण ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, मृतांमध्ये भंगार कंपनीत कामाला असलेले कामगार असण्याची शक्यता आहे. हा स्फोट सकाळी अकराच्या सुमारास झाला, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की, या केमिकल टॅंकरचे तुकडे परिसरातील दोन-तीन किलोमीटरमध्ये पसरले. तसेच परिसरातल्या इमारतींना या स्फोटाचे हादरे जाणवले. त्यामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. स्फोट झाल्यावर केमिकल टॅंकरच्या टाक्या लोकवस्तीत येऊन पडल्या. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडी पोहचल्या असून, आगीवर नियंत्रण आणत आहेत. मात्र, केमिकल असल्याने आग मोठ्या प्रमाणात लागली आहे व भडकली आहे.