आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर राज्यातील औषध विक्रेत्यांचा संप मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अन्न आणि औषध प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेला संप मागे आज (मंगळवारी) घेतला. मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज्यातील औषध विक्रेत्यांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

औषध विक्रेत्यांनी पूर्ण वेळ फार्मासिस्ट नेमावा, असा अन्न आणि औषध प्रशासनाने नवा नियम केला आहे: परंतु याला औषध विक्रेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी आजपासूनच दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेतच दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतरही यावर या मुद्यावर विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचाही इशारा विक्रेत्यांनी दिला होता. तसेच अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईच्या जाचाला कंटाळून विक्रेते आपले परवाने राज्य शासनाला परत करणार असल्याचेही सांगितले जात होते.

दरम्यान, औषध विक्रेत्यांच्या आंदोलनाबाबत गेल्या शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सचिवांशी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली होती. मात्र, या बैठकीतून काहीही तोडगा निघाला नाही.

या मुद्यावर पुढील सात दिवसांत समिती स्थापन करून, यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर औषधे विक्रेत्यांनी संप मागे घेतला आहे.