आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई सुपरकिंग्जची विजयी हॅट््ट्रिक; मुंबई इंडियन्स टीमचा स्पर्धेत सलग चाैथा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी यजमान मुंबई इंडियन्स संघ चारी मुंड्या चीत झाला. यजमान मुंबईला घरच्या मैदानावर दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई संघाचा यंदाच्या सत्रातील हा सलग चाैथा पराभव ठरला. कर्णधार धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने यजमान मुंबईवर ६ गड्यांनी मात केली. यासह चेन्नई संघाने स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक नाेंदवली. तीन बळी घेणारा अाशिष नेहरा सामनावीरचा मानकरी ठरला.
डॅवेन स्मिथ (६२) अाणि मॅक्लुम (४६) यांच्या शतकी भागीदारीच्या मुंबईने विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने सात बाद १८३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात चेन्नई टीमने १६.४ षटकांत ४ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नई संघाकडून सुरेश रैनाने नाबाद ४३ व ब्राव्हाेने १३ खेळी करून विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्सचे तीनतेरा वाजल्यानंतर रोहित शर्मा आणि हरभजनसिंग यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. या दोघांनी मुंबई इंडियन्सचा धावफलक हलता ठेवताना ३५ चेंडूंमध्ये ४५ धावांची भागीदारी रचली. हरभजनसिंगने २४ धावा केल्या.
स्मिथ-मॅक्लुमचा धमाका
चेन्नईकडून सलामीवीर डॅवेन स्मिथ अाणि मॅक्लुमने शतकी भागीदारीचा विजयी धमाका उडवला. या दाेघांनी १०९ धावांची सलामी दिली. यात स्मिथने ३० चेंडूंचा सामना करताना अाठ चाैकार व चार षटकारांसह ६२ धावा काढल्या. मॅक्लुमने २० चेंडूंत ४६ धावा काढल्या. यात सहा चाैकार व दाेन षटकारांचा समावेश अाहे.
सामनावीर नेहराचे ३ बळी
चेन्नई सुपरकिंग्जचा सामनावीर अाशिष नेहरा शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात चांगलाच बहरला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना शानदार तीन विकेट घेतल्या. नेहराने चार षटकांत २३ धावा देताना तीन विकेट घेतल्या. त्याने पार्थिव पटेल (९), काेरी अँडरसन (४), राेहित शर्मा (५०) या तिघांना तंबूत पाठवले. तसेच ब्राव्हाेने दाेन विकेट घेतल्या.
पुढील स्लाइड्वर पाहा, स्कोअर कार्ड आणि पॉइंट्स टेबल...